सुंदर ललना

एका स्त्रीने दुस-या स्त्रीला सुंदर म्हणणं ही खूपच दुर्मिळ गोष्ट. इतरांची उदाहरणे कशाला द्यायची, मी स्वत: माधुरी दीक्षित या मदनिकेच्या सौंदर्यद्वेष्ट्यांमधे सामिल होते. या ललनेला मी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण तिचं हास्य, तिचा आवाज मला पहिल्यापासूनच आवडत गेला आणि स्त्रीसुलभ भावनेतून मी नकळत तिचा मत्सर करू लागले. तिचं सौंदर्य माझ्यासारख्याच कित्येक स्त्रियांच्या मत्सराला कारणीभूत… Read More »

गुगलकाका आणि याहूदादाची गंमत

गुगल काका आता आपल्या सगळ्यांचे लाडके काका झालेले आहेत. त्यांना काही विचारलं आणि उत्तर मिळाली नाही असं होतंच नाही. गुगल काकांच्या मागोमाग नंबर लागतो, तो याहूदादाचा. पण गंमत अशी आहे की गुगलकाका आणि याहूदादाला काही विचारायचं झालं तर एकावेळी एकच प्रश्न विचारता येतो. समजा एकाच वेळी चार प्रशन विचारायचे झाले तर…? ….तर काय? गुगलकाका आणि… Read More »

कुछ कस्मे है जवॉं – काही शपथा जुन्या

हा प्रयोग प्रथमच करून पहात आहे. श्री. तुषार जोशी, नागपूर यांनी केलेले गाण्यांचे अनुवाद पाहिले आणि त्यापासूनच प्रेरणा घेऊन अमिताभ बच्चन अभिनीत ऑंखे या चित्रपटातील ’कुछ कस्मे हैं जवॉं’ या गीताचा स्वैर मराठी अनुवाद करत आहे. या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण केलेले असूनही हे गीत चित्रपटातून वगळण्यात आले होते. पूर्वी हे संपूर्ण गाणं यूट्यूबवर उपल्बध होतं… Read More »

द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ – इथे काळाची मर्यादा नाही

तुम्ही तारूण्याच्या उंबरठ्यावर आहात आणि अचानक एक गोड लहान मुलगा तुम्हाला येऊन सांगू लागला की भविष्यात मीच तुझा नवरा होणार आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही कॉलेजच्या मित्रमैत्रीणींबरोबर हुल्लड करताहात आणि एक लहानशी मुलगी येऊन तुम्हाला ’बाबा’ अशी हाक मारेल, तर कशी अवस्था होईल तुमची? तुमचा जीवनसाथी, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, सतत प्रवासच करत… Read More »

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी…

एकिकडे आपण लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी अशा शब्दांत आपल्या मराठीचं कौतुक गात असतानाच शासनाच्या संकेतस्थळांवर मात्र राज्यभाषा मराठीला दुय्यम स्थान दिलं जात आहे. खरं तर दुय्यम हा शब्दच चुकीचा आहे. गौण हा शब्द वापरायला हवा. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ – http://www.maharashtra.gov.in/ इथे जर तुम्ही भेट दिलीत तर तुमच्या लक्षात येईल की हे संकेतस्थळ उघडतं तेच… Read More »

सरोगेट अॅडव्हर्टायझिंग

सरोगेट मदर हे शब्द ज्यांनी ऐकले असतील त्यांना सरोगेट अॅडव्हर्टायझिंग म्हणजे काय, याचा नक्की अंदाज आला असणार. सरोगेट मदर म्हणजे काय तर गर्भाशय भाड्याने देणं. सरोगेट अॅडव्हर्टायझिंगचा प्रकारही थोडासा तसाच आहे. बाजारात काही उत्पादनं अशी असतात, ज्यांची विक्री होऊ शकते पण त्यांच्या सार्वजनिक जाहिराती करण्यासाठी कायद्याने बंदी असते. उदाहरणार्थ मद्य, सिगारेट इ. अशा उत्पादनांसाठी कंपनी… Read More »

इंटरनेटसोबत माझा पहिला दिवस

इंटरनेट या गोष्टीबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते वर्तमानपत्रातील एका विचित्र बातमीमुळे. पूजा भट्ट…काय म्हणता? तुम्हाला आठवत नाही ही नटी?.. अहो ती नाही का, जिला बरेच चांगले चांगले चित्रपट आणि हिरोही मिळाले पण एकाही चित्रपटात तिने अभिनय कश्शाशी म्हणून खाल्ला नाही, तीच ती. महेश भट्टांची कन्यका… तर पूजा भट आणि तत्सम समकालीन नट्यांचे (?!) चेहेरे आणि… Read More »

मुली झाल्यात दीडशहाण्या?!

बझ्झवर दिलेल्या महाराष्ट्र टाईम्समधे प्रसिद्ध झालेल्याया लेखाच्या दुव्यावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया म्हणून हा लेख लिहित आहे. मुलींच्या मागण्यांची, अपेक्षांची इतकी मोठी यादी समजल्यानंतर मुलांनी भांबावून जाण्याची काहीच गरज नाहीये. डोकं शांत ठेवून विचार केला तर लक्षात येईल की ’नंतर बघू’ असं म्हणून टाळलेले प्रश्न नंतर अडचणी बनून अंगावर येतात. त्यापेक्षा मुलींनी ज्या मागण्या समोर ठेवल्या असतील,… Read More »

बॉईज डोन्ट क्राय – तिच्यातल्या ‘त्याची’ घुसमट

स्त्रीने पुरूषाची भूमिका साकारलेले चित्रपट कमी नाहीत. शी’ज द मॅन’ या चित्रपटातील अमॅन्डा बायन्सने साकारलेला सबॅस्टीअन आणि त्याच चित्रपटातील कल्पनेवर आधारीत भारतीय हिंदी चित्रपट ‘दिल बोले हडीप्पा’ मधील रानी मुखर्जीने साकारलेला वीर ही अगदी ताजी उदाहरणं आहेत. मात्र भारतीय चित्रपटातील स्त्री भूमिका करताना काही निवडक अपवाद वगळता पुरूष कलाकार जो बिभत्सपणा दाखवतात किंवा स्त्री कलाकार… Read More »

कसाब का निकाह

सध्या टि.व्ही. चॅनलवाले काहीही करू शकतात. दोन स्वयंवरं त्यांनी पार पाडली. (त्यातलं एक सगाईवर येऊन थांबलं, ही गोष्ट निराळी) पण आपल्या चॅनलचा टी.आर.पी. वाढवण्यासाठी पारंपारिक संस्कार विधींचाही वापर करायला चॅनलवाले मागे पुढे बघत नाहीत. आता मानवता संदेश नि देश जोडो अभियानही त्यांना राबवता येईल. कसाबने तर त्यांना एक मोठी संधी दिलीय. त्याला हल्ली कसंसंच होतंय… Read More »